Sunday, March 23, 2025

नवभारत साक्षरता अभियान २०२५

आज दिनांक २३/०३/२०२५ रोजी  नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात धाड येथे निरक्षर असलेल्या महिलांना साक्षर करून  परीक्षेच्या माद्यमातून त्यांचे मूल्यमापन करण्यात आले. 


केंद्र सरकारचा नवभारत साक्षरता अभियान हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून  प्रत्येक शाळेसाठी अनिवार्य केला असून प्रत्येक शाळेतील शिक्षकाने आपल्या परिसरातील निरक्षर लोकांना शिकवून साक्षर करणे हा यामागचा  उद्देश आहे .  यांमध्ये  अक्षर ओळख , संख्या ज्ञान यासारख्या पायाभूत गोष्टींचा समावेश आहे . 

या अभियानामध्ये राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय धाड  यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सहभाग नोंदवला . दरम्यान करडी येथील काही निरक्षर महिलांना सही करणे , संख्या ज्ञान , लहान सहान हिशॊब जुळणीने यासारख्या पायाभूत गोष्टी शिकवण्यात आल्या . २३ मार्च २०२५ रोजी त्यांची परीक्षा घेण्यात अली या परीक्षेसाठी  दहा महिलांनी सहभाग   नोंदवला व परीक्षा उत्तीर्ण केली .  परीक्षेदरम्यान घेतलेले काही छायाचित्रे 
























No comments:

Post a Comment