गणपतीच्या अडीच शक्तिपीठांपैकी एक आहे श्री क्षेत्र राजुर; पेशवे आणि खिलजीशी ऐतिहासिक संबंध
क्षेत्र राजुरेश्वर गणपती (Rajureshwar Ganpati) हे देवस्थान गणेशाच्या महाराष्ट्रातील शक्तीपिठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ (Shaktipith of Ganapati) आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात हे तीर्थक्षेत्र आहे. जालन्यापासून 25 किलोमीटर अंतरावर राजुर (Rajur Ganpati) गाव आहे. नवसाला पावणारा गणपती अशी राजूरेश्वराची ख्याती आहे. दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि अंगारीका चतुर्थीच्या (Angarika Chaturthi) निमीत्ताने येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अंगारीका चतुर्थीला जालना भोकरदन आणि आजुबाजूच्या गावातील लोक या ठिकाणी दर्शनासाठी पायी चालत येतात. या ठिकाणी इतर राज्यातून देखील लाखो भाविक येतात आणि नवस पूर्ण करण्यासाठी राजुरेश्वराला (Shri Kshetra Rajur) साकडे घालतात
श्री क्षेत्र राजुर गणपतीचे महत्त्व (Importance of Rajur Ganapati)
गणेश पुराणात राजुरेश्वर गणपतीची एक आख्यायिका आहे. वरणेश्वर नावाच्या राजाला अपत्य नसल्याने त्याने गणेशाची आराधना केली. त्याच्या भक्तीनं श्री गणेश प्रसन्न झाले. त्यांनी राजाला पुत्रप्राप्तीचा आशिर्वाद दिला. काही काळानंतर राजाला मुलगा झाला. मात्र तो कुरुप असल्याने राजाने त्याल वनात सोडून दिले. नंतर या मुलाचा सांभाळ अगस्ती ऋषींनी केला. त्यांच्या देखरेखी खाली याने सर्व विद्येचे शिक्षण घेतले. पुढे याच मुलाने आपला ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या सिंदूरासुराचा वध केला. यानंतर राजाला आपली चूक कळली आणि तो अगस्ती ऋषींना शरण गेला. त्याने आपल्या मुलाला या गडावर आणलं आणि राज्याभिषेक केला. तो वरण्य राजाचा पुत्र म्हणजेच हा राजुरेशवर गणपती.
.jpeg)



No comments:
Post a Comment